भारतीय हवामान विभागच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मुख्यतः ढगाळ राहण्याची अधिक शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेणे प्रचंड महत्वाचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. पावसाच्या वातावरणामुळे काढणीला आलेल्या पिकांची योग्य ती विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. तसेच पिकांना पाणी देण्यापूर्वी व औषधे फवारण्यापूर्वी हवामान आधारित पीक निहाय कृषी सल्ला जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहे.
शेतकऱ्यांनी पिकाची घ्यावी काळजी
• परिपक्व अवस्थेतीलकापणी केलेला सोयाबीन व इतर शेतमाल प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा व
तयार शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
• तसेच कृषी रसायनांच्या फवारणीचे कामे, उभ्या पिकांमध्ये
खते देण्याची कामे पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज लक्षात घेता पुढे ढकलावी.
• त्यानंतर सकाळच्या वेळी
स्थानिक शांत आणि स्वच्छ हवामान परिस्थिती बघून करावी.
• सोयाबीन, उडीद व मुग आणि इतर पिकांचा काढणी/
कापणी केलेल्या शेतमाल प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा तसेच सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
•
स्थानिक हवामान अंदाज व सूचना यांचा अंदाज घेऊनच शेती कामाचे नियोजन करावे.
• पाऊस व मेघगर्जनेसह
विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकरी व शेतमजूर यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
• शेतातील अति महत्वाची कामे शक्यतो सकाळच्या वेळी उरकून घेण्याला प्राधान्य द्यावे