नाशिक जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या लासलगाव बाजार समितीमध्ये आता लाल कांद्यांची आवक सुरू झाली आहे.
नाशिक : नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याच्या खराब होण्याच्या प्रकरणाची आता हस्तक्षेप चौकशी करून या प्रकरणाचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हा प्रशासन सादर करणार आहे. याबाबतचा अहवाल हा पोर्टलवर देखील जाहीर करण्याचे आदेश मंगळवारी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.
केंद्र सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेमध्ये दखल देत कांद्याचे भाव हे गगनाला भिडत असताना सर्वसाधारण मी जून महिन्यात करून नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. हा सर्वसाधारण काही लाख टन कांदा हा नाफेडने अतिशय कवडीमोल भावात सर्वसाधारण ९ ते १४ रुपये या भावामध्ये प्रति क्विंटल दर दिला होता. खरेदी करून आपल्या गोदामामध्ये ठेवला. मधल्या काळात जोरदार पाऊस झाला आणि या काळात तो कांदा बाहेर येऊ शकला नाही.
या सर्व गोष्टीला नाफेडचे प्रशासनच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. आज या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याचे स्वागत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे – भारत दिघोळे, अध्यक्ष कांदा – उत्पादक शेतकरी संघटना