इतर राज्यांच्या तुलने उत्तर प्रदेश आणि बहारमध्ये गव्हाच्या किंमतीत 4 ते 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. या दोन्ही राज्यांना प्रथमच गव्हाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.
देशातील सर्वात मोठं गहू (Wheat) उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये गव्हाची चंटाई निर्माण झाली आहे. त्यामुळं तिथे गव्हाच्या किंमतीत (Wheat prices) वाढ झाली आहे. तसेच बिहारमध्ये देखील गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. इतर राज्यांच्या तुलने उत्तर प्रदेश आणि बहारमध्ये गव्हाच्या किंमतीत 4 ते 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. या दोन्ही राज्यांना प्रथमच गव्हाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीत वाढ होत आहे.
केंद्र सरकारकडून प्रथमच गव्हाची उपलब्धता न होणं आणि निर्यातीसाठी सर्व अतिरिक्त गहू पाठवणे यामुळं गव्हाच्या किंमती पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तुलनेने जास्त आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये गव्हाला मोठी मागणी आहे. निर्यातीसाठी उत्तरेकडील गहू जास्त प्रमाणात गेला आहे. तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुरेसा पुरवठा आहे. कारण मे महिन्यात गहू निर्यात बंदीनंतर गहू बंदरांवर अडकून पडला आहे.