सूर्य तळपू लागल्याने तापमान (Temperature) चाळिशीपार गेले आहे. राज्यात उन्हाच्या झळा असह्य होत असतानाच उकाड्यातही वाढ झाली आहे.
यातच आजपासून (ता. ७) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज (Stormy Rain Forecast) आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीसह पावसाचा (Hailstorm Alert), विदर्भाच्या काही भागांत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने (Weather Department) दिला आहे.
राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तर सोलापूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा येथे तापमान ४० अंशांच्या वर गेले आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा १५ ते २७ अंशांच्या दरम्यान होता.
उत्तर कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर अंतर्गत कर्नाटकपासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर खंडित वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. Hailstorm
गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३६.८ (१७.५), जळगाव ३८.५ (२०), धुळे ३८ (१७), कोल्हापूर ३६.७ (२२.७), महाबळेश्वर ३१.५ (१८.१), नाशिक ३५.२ (१९.३),
निफाड ३५.५ (१५.१), सांगली ३७.६ (२३.५), सातारा ३६.२ (२१.३), सोलापूर ४०.३ (२५.१), सांताक्रूझ ३२ (२२.८), डहाणू ३२.६ (२२.६), रत्नागिरी ३२.३ (२२.५),
छत्रपती संभाजीनगर ३७.२ (२०.४), नांदेड ३८ (२४.२), परभणी ३९.१ (२४.१), अकोला ४०.४ (२२.८), अमरावती ३८.८ (२३), बुलडाणा ३८ (२४), ब्रह्मपुरी ४०.२ (२४.४),
चंद्रपूर ४०.२ (२५.४), गडचिरोली ३५.८ (२०.४), गोंदिया ३८.२ (२२.८), नागपूर ३८.६ (२३.५), वर्धा ४० (२६.८), वाशीम – (२०), यवतमाळ ३८.७ (२४.७).
वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड.
वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया.