राज्यात 30,31 मे व 1,2,3,4 जून राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे . 25 मे ते 27 मे दरम्याण पूर्व विदर्भ व मराठवाडा मुंबई कोकनपट्टी तुरळक ठिकाणी पाउस पडेल . मान्सून चा पाऊस येण्यासाठी अद्याप 13 दिवस राहीले आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.
राज्यात 30 ,31 मे व 1 जून 2,3,4, दरम्याण . मान्सून पूर्व पावसाचे जोरदार पाउस पडणार आहे हा पाउस मुंबई कोकनपट्टी, नाशिक इगतपुरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, पूणे, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी ,जालना, औरंगाबाद, बिड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नागपूर, अकोला या जिल्ह्यातील ठिकठिकाणी पडेल. राज्यात काही जिल्हात खूप ठिकाणी पाउस जोरदार पाउस पडणार आहे हा अंदाज लक्षात घेउन शेतीचे नियोजन करावे. शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण,बदलते माहीत असावे.
पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.24/ 05/2022