अन्नधान्य पिक: हे अभियान भात, गहू, कडधान्य, भरडधान्य (मका) व पौष्टिक तृणधान्य( ज्वारी, बाजरी, रागी) या पिकांसाठी राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-कडधान्य हे राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
तर इतर पिकांसाठी ची अभियाने काही जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. सदर अभियानासाठी अर्थ सहाय्य केंद्र हिस्सा 60 टक्के व राज्य हिस्सा 40 टक्के असा आहे.वरिल पिकांचे क्षेत्र व उत्पादकता वाढावी या उद्देशाने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत राबविण्यात येणारे घटक-
1.पिक प्रात्यक्षिके –
पिक प्रात्यक्षिकां साठी विभागिय कृषी सह संचालक यांचे स्तरावर संलग्न कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा/तालुका/पिक निहाय निर्धारित तंत्रज्ञान पैकेज नुसार सर्व घटक अंमलबजावणी साठी, रासायनिक खतावरिल खर्च लाभार्थी शेतकरी यांनी स्वत: करावयाचा आहे यासाठी अनुदान देय नाही.
अ. सुधारित तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्यक्षिके – रु. 9000 प्रती हेक्टर अनुदान.
ब. आंतर पिक प्रात्यक्षिक – रु. 9000 प्रती हेक्टर अनुदान.
क. पिक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिके – रु.15000 प्रती हेक्टर अनुदान.
2. राज्यासाठी अधिसूचित अधिक उत्पादन देणारे वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण-
अ. मागिल 10 वर्षाच्या आतील अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण – किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.5000 प्रती क्विंटल अनुदान.
ब. 10 वर्षाच्या वरील अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण – किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.2500 प्रती क्विंटल अनुदान.
3. एकात्मिक किड/रोग व्यवस्थापन-
1. किडनाशके – यासाठी 50 टक्के, कमाल रु.500 प्रती हेक्टर अनुदान देय आहे.
2. तण नाशके – तण नाशकाच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के , कमाल रु.500 प्रती हे. अनुदान देय आहे. त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या तण नाशकांची खरेदी करावी व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.
४. पिक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण-
एकुण रु.14000 प्रती प्रशिक्षण (रु.3500 प्रती सत्र). 30 शेतकरी यांचे साठी 4 सत्राकरिता (2 सत्र खरीप मध्ये व 2 सत्र रबी मध्ये).
५. प्रकल्प व्यवस्थापन चमू- तंत्र सल्लागार व तंत्र सहाय्यक.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भात अंतर्गत राबविण्यात येणारे घटक-
1.पिक प्रात्यक्षिके –
पिक प्रात्यक्षिकां साठी विभागिय कृषी सह संचालक यांचे स्तरावर संलग्न कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा/तालुका/पिक निहाय निर्धारित तंत्रज्ञान पैकेज नुसार सर्व घटक अंमलबजावणी साठी, रासायनिक खतावरिल खर्च लाभार्थी शेतकरी यांनी स्वत: करावयाचा आहे यासाठी अनुदान देय नाही.
अ. सुधारित तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्यक्षिके – रु. 9000 प्रती हेक्टर अनुदान.
ब. पिक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिके – रु.15000 प्रती हेक्टर अनुदान.
2. राज्यासाठी अधिसूचित अधिक उत्पादन देणारे वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण-
अ. संकरीत वाण – किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.१०000 प्रती क्विंटल अनुदान.
ब. मागिल 10 वर्षाच्या आतील अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण – किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.२000 प्रती क्विंटल अनुदान.
क. 10 वर्षाच्या वरील अधिसूचित वाणाचे प्रमाणित बियाणे वितरण – किमतीच्या 50 टक्के किंवा कमाल रु.१०00 प्रती क्विंटल अनुदान.
3. एकात्मिक किड/रोग व्यवस्थापन-
1. किडनाशके – यासाठी 50 टक्के, कमाल रु.500 प्रती हेक्टर अनुदान देय आहे.
2. तण नाशके – तण नाशकाच्या वापरासाठी किमतीच्या 50 टक्के, कमाल रु.500 प्रती हे. अनुदान देय आहे.
त्यासाठी लाभार्थी शेतकरी गटाने खुल्या बाजारातून त्यांच्या पसंतीने लेबल क्लेम असलेल्या तण नाशकांची खरेदी करावी व त्यानंतर गटातील शेतकरी यांच्या आधार संलग्न राष्ट्रियकृत बँक खात्यात अनुदान थेट जमा करण्यात येइल.
४. पिक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण-
एकुण रु.14000 प्रती प्रशिक्षण (रु.3500 प्रती सत्र). 30 शेतकरी यांचे साठी 4 सत्राकरिता (2 सत्र खरीप मध्ये व 2 सत्र रबी मध्ये).