गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाला. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस लागवडीवर भर दिला आहे. यावर्षी कापसाला काही दिवस नऊ हजार ते दहा हजार रुपये असा दर मिळत होता. मात्र हा जास्त दिवस टिकला नाही. आता कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
शेतकऱ्यांना कापसाल कमी भाव मिळत आहे. आता कापसाला सुरवातीलाच 6000 ते 7000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे पुढे काय होणार. त्याच बरोबर पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे.
परतीच्या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणि आता भाव ही कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पहिल्याच पावसात कापूस पिकाचे नुकसान झाले असून उर्वरित उत्पादनाला कमी भाव मिळत आहे. आणि आजतागायत माझ्या नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा झालेला नाही.अशा परिस्थितीत आपण शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
बाजारपेठेतील कापसाचे भावही खाली आले आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. कापसाला (Cotton) सुरुवातीला एवढा कमी भाव मिळत असेल तर पुढे काय होणार, असे शेतकरी सांगतात. त्याचबरोबर काही शेतकरी आतापासूनच कापूस साठवून ठेवण्याचा विचार करत आहेत.