मराठवाड्यात सद्यस्थितीत तूर पिकावर ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी (maruca vitrata) या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे
१) ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी (मारूका अळी) (Maruca vitrata) ही कडधान्य पिकावरील ठिपक्यांची शेंगा पोखरणारी कीड आहे. या किडीचा पतंग करडया रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे दिसून येतात.मादी पतंग कळ्या, फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढऱ्या रंगाची व अर्ध पारदर्शक असते. तिच्या पाठीवर काळ्या रंगाच्या सहा ठिपक्यांच्या जोड्या आढळतात.अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना एकत्रित करून जाळीचे झुपके करून त्यामध्ये राहून कळ्या, फुले, शेंगा खाते.या किडीचा जीवनक्रम १८ ते ३५ दिवसात पूर्ण होतो.
एकात्मिक किड व्यवस्थापन
१) उन्हाळ्यात खोलून नांगरणी करावी यामुळे कोष अवस्थेतील किडी नष्ट होतात.
२) तूरीमध्ये ९० दिवसापर्यंत आंतर मशागत करुन उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी हि तण वेळोवेळी काढून टाकावी.
३) शेतामध्ये एकरी १०- १५ पक्षी थांबे लावावेत.
४) पीक कळी अवस्थेत असताना अझाडीरिक्टिन ००.०३ डब्लू, एस. पी (३०० पी.पी.एम) ची फवारणी करावी.
५) किडीनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा.
ठीपक्याच्या शेंगा पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ०.५% एस .जी ४.४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किँवा क्लोरँट्रेनिलीप्रोल 18.5% एससी प्रति ३ मिली प्रती १०लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. किँवा इन्डोक्साकार्ब १४.५. एस. सी ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
( सर्व कीटकनाशक हे लेबल क्लेम नुसार आहेत)
प्रा.अमोल पांडूरंग ढोरमारे
( कीटकशास्त्रज्ञ द अग्रि कोड कृषि प्रतिष्ठान खापर पांगरी बीड)मो. न ९६०४८३३८१