पीएम किसान योजनेचा13वा हप्ता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. पण काही नियमात बदल करण्यात आल्याने काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 13वा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी (Farmer) पीएम किसान योजनेसाठी लागणारी सगळी कागदपत्रे दिलेली नाहीत, त्यामुळे त्यांना सध्याचा मिळणार नाही. केंद्र सरकारकडून 31 मे रोजी 10.45 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता म्हणून 22,552 कोटी रुपये जाहीर केले होते. विशेष म्हणजे त्यांच्या पुढच्या हप्त्यात लाभार्थी शेतकऱ्यांची घट झाली होती. 12 व्या हप्त्यात 8.42 कोटी शेतकऱ्यांना 17,443 कोटी रुपये जाहीर करण्यात आले.
शेतकऱ्यांना हप्ता न मिळण्याचं कारण असं आहे की, जमीन आणि लाभार्थी शेतकऱ्यांचं रेकॉर्ड सेंट्रल डेटाबेसमध्ये अपडेट करण्यात आलेलं नाही. केंद्रातल्या सरकारने गैरप्रकार थांबण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत काही कागदपत्रे अपडेट करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं होतं. देशातील काही राज्यांनी आता सेंट्रल डेटाबेस अपडेट करण्याचं काम सुरु केलं आहे.
या चार गोष्टी महत्त्वाच्या
1). शेतकरी खरोखरच त्या जमिनीचा मालक आहे,त्याच्या जमिनीची सरकार दरबारी नोंद आहे.
2). शेतकऱ्यांच्या वेबसाईटवरती शेतकऱ्यांची ई-केवासी पूर्ण असावी.
3). शेतकऱ्याचे बँक खाते आधारकार्ड ला जोडलेले असावे.
4). त्याचबरोबर बँक खाते भारतीय राष्ट्रीय निगम पेमेंटशी सांबांधित असणे गरजेचे आहे.