सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता पुणे शहरात आगामी दोन दिवस ढगाळ वातारण राहील. त्यानंतर 13 ते 15 मार्च या कालावधीत वादळी वार्यांसह हलक्या पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे.
पुणे शहराचे कमाल तापमान 30 अंशांवरून पुन्हा 35 ते 36 अंशांवर गेले. मात्र, उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने शहरात 13 ते 15 मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा शुक्रवारी वेधशाळेने दिला आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, शहरात 7 व 8 मार्च रोजी हलका पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर लगेच कमाल तापमानात वाढ होऊन उकाड्यास सुरुवात झाली.
असे असताना आता उन्हाळ्याच्या तोंडावर पुन्हा पाऊस पडणार असल्याने पुन्हा गर्मी वाढू शकते. यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात काळजी घेणे गरजेचे आहे.
यामुळे आता काढणीला आलेली पिके लवकरात लवकर काढून घ्यावीत. नाहीतर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. गेल्या काही दिवसांमध्ये या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.