महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके राहणार आहेत. गुरुवारी (ता.४ ) महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन ते १०१० हेप्टापास्कल इतके होतील. शुक्रवार व शनिवारी (ता. ५, ६ मे) हवेचे दाब पुन्हा १००८ हेप्टापास्कल इतके होतील.
आज व उद्या (ता. ३० एप्रिल व १ मे) उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून वादळी वारे, विजांचा कडकडाटासह गारपीट व पाऊस होण्याचे प्रकार राज्यात होत आहेत.
या आठवड्याच्या सुरुवातीस पुन्हा तशाच हवामान स्थितीची शक्यता आहे. या आठवड्यात कमाल व किमान तापमानात फारशी वाढ अपेक्षित नाही. धुळे व यवतमाळ जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी १५ ते १६ किमी इतका राहील. संपूर्ण आठवडाभर हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैऋत्य व आग्नेयेकडून राहील.
अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस, बंगालचे उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८१५ अंश सेल्सिअस राहील. हिंदी महासागर व प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहील.
एल निनोचा प्रभाव सध्या राहणार नाही. एल निनो तटस्थ राहण्यामुळे व मागील काही महिने महाराष्ट्रात हवामान बदलामुळे पाऊस होत आहे.
कोकण
कमाल तापमान पालघर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील.
सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४० टक्के इतकी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आग्नेयेकडून, रायगड जिल्ह्यात वायव्येकडून, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील.
मराठवाडा
नांदेड जिल्ह्यात आज (ता. ३०) ३५ मिमी, तर उद्या (ता.१ मे) ९० मिमी पावसाची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यात आज (ता.३०) ४२ मिमी व उद्या (ता.१ मे) १६ मिमी पावसाची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात आज (ता.३०) ४२ मिमी व उद्या (ता.१ मे) १२ मिमी पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात आज (ता. ३०) ३५ मिमी व उद्या (ता.१ मे) १८ मिमी पावसाची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात आज (ता.३०) ३५ मिमी व उद्या (ता.१ मे) २६ मिमी पावसाची शक्यता आहे. आज व उद्या (ता.३०, १ मे) जालना जिल्ह्यात १३ मिमी पावसाची शक्यता राहील.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज (ता. ३०) ७ मिमी, तर उद्या (ता.१ मे) ३ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून तर वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ११ मिमी राहील. कमाल तापमान नांदेड व हिंगोली जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ७३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३४ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ
बुलडाणा जिल्ह्यात आज (ता.३०) २८ मिमी व उद्या (ता.१ मे) १० मिमी पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात आज (ता.३०) २३ मिमी व उद्या (ता.१ मे) ३३ मिमी पावसाची शक्यता आहे. वाशीम जिल्ह्यात आज (ता.३०) ३१ मिमी व उद्या (ता.१ मे) ११ मिमी पावसाची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात आज (ता.३०) ९ मिमी व उद्या (ता.१ मे) ३ मिमी पावसाची शक्यता आहे.
कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४८ टक्के तर वाशीम जिल्ह्यात ६२ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के राहील.
मध्य विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात आज (ता.३०) ३० मिमी व उद्या (ता.१ मे) ७४ मिमी पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यात आज (ता. ३०) ६ मिमी व उद्या (ता. १ मे) ४८ मिमी पावसाची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात आज (ता. ३०) ९ मिमी व उद्या (ता.१ मे) २९ मिमी पावसाची शक्यता आहे.
वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग यवतमाळ जिल्ह्यात १६ किमी, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ९ ते ११ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ७१ टक्के, तर दुपारची २३ ते २९ टक्के राहील.
पूर्व विदर्भ
गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत आज (ता.३०) ९ ते ११ मिमी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उद्या (ता.१ मे) १२ मिमी, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ६ ते ८ मिमी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उद्या (ता. १ मे) १२ मिमी, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ६ ते ८ मिमी पावसाची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहील.
वाऱ्याची दिशा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ७१ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ५४ ते ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३१ टक्के राहील.
पश्चिम महाराष्ट्र
सोलापूर जिल्ह्यात आज (ता.३०) २८ मिमी व उद्या (ता.१ मे) ५ मिमी पावसाची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात आज (ता. ३०) ५ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून, तर ताशी वेग ७ ते ९ किमी राहील. सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी १३ किमी राहील.
कमाल तापमान सोलापूर, सांगली व नगर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर सातारा व पुणे जिल्ह्यांत ३६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत २४ अंश, सांगली जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर सातारा, पुणे, नगर जिल्ह्यांत २० ते २२ अंश सेल्सिअस राहील.
आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८० टक्के व उर्वरित जिल्ह्यात ५५ ते ६७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते ३१ टक्के राहील.
कृषी सल्ला
– उन्हाळी, भुईमूग पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
– आंबा फळांची काढणी सकाळी व सायंकाळी करावी.
– नवीन फळबाग रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्याकरिता रोपांना वरून सावली करावी.
– उन्हाळी हंगामात जमिनीची खोल नांगरट करून उन्हात तापू द्यावी.
– आंबा झाडावरील बांडगुळे काढावीत.