शेतकऱ्यांनो शेती मशागतीची कामे वेळेत उरकून घ्यावीत, मान्सूनचे आगमन लवकरच होणार आहे, असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले आहे. तर आजपासून तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता देखील डख यांनी वर्तवली आहे.
यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. तसेच मशागतीची कामे करत आहेत. पंजाबराव डख यांनी आपल्या अभ्यासानुसार यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे सांगितले. तसेच पाऊस कुठं पडतो याची बरीच माहिती उदाहरणांसह सांगितली.
तसेच येत्या 22, 23, 24 मे रोजी मान्सूनपूर्व पाऊस पडणार असून, जून महिन्याच्या 1, 2, 3 तारखेला देखील पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. तर 8 जून रोजी महाराष्ट्रात मोसमी पावसाची दमदार हजेरी लावून यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आता नेमका किती पाऊस पडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मी फक्त शेतकऱ्यांचा हितासाठी हवामानाचा अंदाज सांगून पावसामुळे शेतकऱ्यांचे होणार नुकसान टाळण्यासाठी व पुढील नियोजनासाठी सांगत आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीसाठी थोडे दिवस राहिले आहेत. त्यांनी लवकरात लवकर शेतीच्या मशागतीची कामे करून खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज राहावे, असेही पंजाबराव डख यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यभरातील शेतकऱ्यांचे (Farmers) लक्ष यंदाच्या मान्सूनकडे (Mansoon) लागले असून, यंदा मान्सून कधी दाखल होणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे