कडक उन्हाळ्या नंतर पावसाळा सुरु होतो आणि त्यानुसार म्हशींच्या व्यवस्थापनात बदल करावा लागतो. सर्व साधारणपणे जून ते सप्टेंबर पर्यंत पावसाळा चालू असतो.
या दरम्यान बहुतांश म्हशी गाभण (Pregnant Buffalo)असतात आणि या काळातच म्हशी जास्त प्रमाणात वितात.
सर्वसाधारणपणे फायदेशीर दुग्ध व्यवसायाकरिता १३ ते १४ महिन्यात म्हशी व्यायल्या पाहिजे. योग्य दुध उत्पादन व वासरांची निर्मिती प्रत्येक १३ ते १४ महिण्यात झाले पाहिजे.
म्हशींतील प्रजननाचे कार्य वेळेवर होत नसेल तर नेमक्या कोणत्या कराणांमुळे म्हशीतील प्रजननात समस्या येतात त्या ओळखणे गरजेचे असते.
म्हशींच्या प्रजननातील समस्या
वातावरण बदलाचा निश्चितच म्हशीतील प्रजनन कार्यात विविध समस्या दिसून येतात.
यामध्ये मुका माज किंवा क्षीण माजाचा प्रकार, वंध्यत्वाची समस्या जसे कि
माजावर न येणे,
सतत उलटणे,
गाभण न राहणे,
विण्याच्या प्रक्रियेत अडथळा,
वार न पडणे, गर्भपात होणे, ई.
ज्या म्हशीमध्ये तात्पुरते वंधत्व असते व सतत उलटणे वगैरे सारखे प्रजननातील अडथळे असतील तर वेळीच आधुनिक पद्धतीचा त्वरित उपचार करून घेणे गरजेचे असते.
या व इतर अनेक प्रजनन संस्थेच्या अडथळयामुळे प्रजनन क्षमता कमी होते.