शुगर केन ब्रिडिंग इन्स्टिट्यूट, रिजनल सेंटर कर्नाल (हरियाणा) या संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी उसाची हेक्टरी 94.97 मेट्रिक टन उत्पादन व 11.96 टक्के साखर उतारा असणारी को-16030 ही नवीन जात विकसित केली आहे. ‘करण-16’असे नामकरणही शास्त्रज्ञांनी केले आहे.
ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट (AICRP) या संस्थेच्या 34 व्या वार्षिक सभेत ही घोषणा करण्यात आली. शास्त्रज्ञांच्या मते, मध्यम पक्वतेच्या गटात मोडणारी ही व्हरायटी असून याची देशाच्या पश्चिम आणि उत्तर विभागात 2019-20 आणि 2021-22 या हंगामात यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. लवकरच ही जात शेतकर्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे या सभेत सांगण्यात आले.
उसाचे सर्वोच्च एकरी उत्पादन आणि साखरेचा सर्वोच्च उतारा या दोन्हीचे कॉम्बिनेशन असणारी ही जात असून रेड रॉट पॅथोजन व पाने पिवळी पडणे या रोगांना बळी न पडणारी व केवळ बारा महिन्यात पक्व होणारी ही जात आहे. या जातीचा साखर उतारा 11.96 टक्के असून हेक्टरी 94.97 मेट्रिक टन उसाचे उत्पादन मिळते, असे रिजनल सेंटरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. के. पांडे यांनी सांगितले.
ही जात सध्याच्या CoS -767, CoPant -97222 Co-0501 या व्हरायटींना परिपूर्ण पर्याय ठरेल, असा दावा डॉ. पांडे यांनी केला आहे.