रासायनिक खते हा शेतकऱ्यांशी निगडीत एक महत्वाची बाब असून रासायनिक खतांवर शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाचे उत्पादन अवलंबून असते. आतापर्यंत आपण अलीकडील परिस्थिती पाहिली तर बऱ्याच ठिकाणी बोगस खतांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळतो
व अशा बोगस खतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होते व पिकांवर विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर खतांच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली असून या रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी ती खूप महत्त्वाचे आहे.
राज्यात 19 कंपन्यांच्या खतांवर राज्यात बंदी
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार कृषी सहसंचालक यांनी तब्बल 19 कंपनीच्या खताचे नमुने अप्रमाणित आढल्याने त्यांच्यावर बंदी घातली असून संबंधित खते शेतकरी बंधुंनी खरेदी करू नये, अशा संबंधीचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
नेमकी बंदी का घालण्यात आली?
विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार खरीप व रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांची गुणवत्तेची खात्री करता यावी यासाठी विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.
व त्यातील 19 खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने हे खत विक्री करण्यावर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बंधुंनी ही खते खरेदी करू नये अशा आशयाची आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
नेमकी कोणती आहे ती खते?
यामध्ये जिंकेटेड एस एस पी, सायन्स केमिकल नाशिक, कृषक भारती को-ऑपरेटिव चिलेटेड फेरस, रामा फॉस्पेट उदयपूर, एस एस पी के पी आर, ॲग्रो केम आणि इतर असे मिळून 19 खतांचे नमुने अप्रमाणित आढळले असून त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
या खतामधील इनग्रेड कमी झाल्यामुळे ते अप्रामाणिक करण्याचे आदेश कृषी सहसंचालक यांनी दिले आहेत. त्यासोबतच कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी खते बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करताना उत्पादकांचा परवाना, फॉर्म स्टेटमेंट तसेच प्रिन्सिपल सर्टिफिकेटची तपासणी करणे गरजेचे आहे.
नाहीतर अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा देखील कृषी सहसंचालक यांच्या आदेशाने देण्यात आला आहे. या खतावर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी आता सावध राहणे गरजेचे आहे.