राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उसतोडणी यंत्रास अनुदान योजना सन २०२३-२४ करिता दि.२१ एप्रिल पासून सुरूवात होणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. यामुळे ज्यांना लाभ घेयचा आहे त्यांनी अर्ज दाखल करावेत
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यास शासनाने निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे.
त्यानुसार सदरची योजना कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणार आहे. ऊस तोडणी ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक व्यावसाईक यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्दतीने ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार अर्ज करावेत.
संकेतस्थळ https://mahadbtmaharashtra.gov.in/Farmer/login/login हे महा डीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील सूचनांप्रमाणे अर्ज भराया. स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC) ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्जदार अर्ज करू शकतील.
अर्जदार नोंदणी अर्जदारांनी प्रथमतः वापरकर्त्याचे नाव (User Name) व संकेत शब्द (Password) तयार करून नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर पुन्हा लॉग-इन करून त्यांचे प्रोफाईल तयार करावे.