उन्हाळ्यात देशातील चिकनचे भाव वाढलेले दिसतात. उन्हामुळे उत्पादनावर परिणाम होत असतो. यामुळे दर वाढतात. पण यंदा दरात झालेली वाढ जास्त आहे. सध्या देशातील वेगवेगळ्या भागात चिकनची किरकोळ विक्री २८० ते २३० रुपये प्रतिकिलोने होत आहे.
देशात वर्षाला ४० लाख टन चिकनचे उत्पादन होते. याचे मुल्य जवळपास १ हजार ८५० कोटी रुपये असते. देशाच्या एकूण मांस उत्पादनात चिकनाचा वाटा ५० टक्के एवढा आहे.