शंभर दिवसापासून देशातील अंड्याचे मार्केट मोठ्या मंदीच्या छायेत आहे. या दरम्यान, चालू आठवड्यात अंड्याच्या भावात हलकी सुधारणा दिसली आहे. मालेगाव विभागात शेतावरील माल उचल रेट (फार्म लिफ्टिंग) 370 ते 380 प्रतिशेकडा रेट निघाला. दरवर्षी मेच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर बाजार सुधारतात. तसा अनुभव यावेळी दृष्टीक्षेपात आहे.
लेअर पोल्ट्री (अंडी) उत्पादन क्षमतेत विस्तार हे प्रमुख कारण सांगितले गेले. पुढे कच्चा मालाचे दर वधारल्याने मार्जिन आणखी रोडावत गेले. मागील शंभर दिवसांत उत्पादन खर्च साडेचार रुपये प्रतिअंडी तर विक्री रेट साडे तीन रुपयाच्या खाली होते. इतक्या दीर्घकाळ एवढा मार्जिन कट होवू शकते हे अनेकांसाठी नवीन होते. सध्याच्या #उष्णकाळ मुळे प्रंचड प्रमाणात मरतूक सुरू आहे. छोट्या फार्ममध्ये शेकडोने पक्षी मरतुकीचे रिपोर्ट्स मिळत आहे.
यापुढे बाजार वधारण्याचे तीन क्लासिकल कारणे – 1. उष्णतेमुळे उत्पादन घट, 2. बाजारभावातील दीर्घ मंदीमुळे खेळते भांडवल आटून उत्पादन कमी होणे. 3. जून पासून उष्णता कमी होणे, पावसाळ्यामुळे खपात वाढ होणे व बाजाराचे सेंटिमेंट बदलणे.
– Deepak Chavan 11-5-2022