गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या कोरोना महामारी आणि लम्पी सारख्या आजारानंतर सध्या दूध धंद्यांत शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. दुधाला सध्या चांगले दर आहेत. यामुळे शेतकरी समाधानी आहे.
तसेच सध्या दुभत्या जनावरांना मागणी वाढल्याने त्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोना काळात महागाईमुळे दूध व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडला होता. त्यामुळे नाइलाजाने अनेक शेतकर्यांना गोठ्यातील जनावरांची संख्या कमी करावी लागली.
यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. त्या काळात अनेक दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले होते. कोरोनाच्या काळामध्ये 50 ते 60 हजार रुपये किमत असलेल्या गाईला आता तब्बल 1 लाख रुपयांच्या पुढे मागणी केली जात आहे.
यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. तसेच दुधाला 35 रुपयांपेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना चार पैसे शिल्लक मिळू लागले आहेत. याआधी केवळ शेणखतासाठी हा व्यवसाय केला जात होता.
असे असले तरी सध्या वाढत्या महागाईमुळे दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. पशुखाद्य, औषधे, वाळलेला व हिरवा चारा, मुजरांचा खर्च, विमा यामुळे दुधाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.