सध्या महागाईमुळे देशातील सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे महागाई कमी करण्याची मागणी सर्वजण करत आहेत. असे असताना सध्या गुजरात निवडणूक तोंडावर आली आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीमुळे सर्वांना दिलासा भेटण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याचे कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा भारताला मोठा फायदा झाला आहे. रशियाकडून भारतास अगदी स्वस्तात म्हणजेच एक चतुर्थांश किमतीत कच्चे तेल मिळत आहे. यामुळे गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुकांमुळे पेट्राेल, डिझेलच्या दरकपातीची शक्यता आहे.
तसेच सध्या इराककडून देखील स्वस्तात पेट्रोल डिझेल मिळत आहे. कंपन्यांचा वाढता नफा लक्षात घेता पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर २ रुपये कपात केली जाऊ शकते. अमेरिका व युरोपियन देश रशियाच्या तेलाच्या किमती निश्चित करणार आहे.
तेव्हा सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेल कंपन्यांनी मात्र दरांत कपात केलेली नव्हती. आता याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होईल.
याचा भारताला फायदा होणार आहे. इराकनेही भारतासाठी तेलाच्या किमती घटविल्या आहेत. इराक रशियापेक्षा ९ डॉलरने कमी दरात कच्चे तेल देत आहे. यामुळे याबाबत निर्णय होऊ शकतो. भारतात शेवटची इंधन दर कपात २२ मे रोजी झाली होती.