आंबा प्रेमींसाठी खुशखबर आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईतील वाशी मार्केटला आली आहे. देवगड हापूसच्या यावर्षीची पहिली पेटी पाठवण्याचा कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे यांना मिळाला आहे.
देवडमधील कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूस आंबे मुंबईतील वाशी मार्केटला पाठवले आहेत. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून दोन डझन आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला पाठवली आहे.
हापूसला नऊ हजारांचा विक्रमी दर
दोन डझनाची पहिली पेटी एपीएमसी बाजारातील व्यापारी अशोक हांडे यांच्याकडे शुक्रवारी (ता. २५) दाखल झाली. या आंब्याची विधिवत पूजा करून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली असून या हापूसला नऊ हजार रुपये दर मिळाला आहे.