पाऊस लांबल्याने यंदा राज्यातील कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे नवीन कांद्याचा हंगाम लांबल्याने दरांमध्ये वाढ झाली होती. हीच परिस्थिती बटाटा आणि लसणाच्या बाबतीत होती, पण आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, बटाटा, लसणाची आवक वाढली असून दर देखील घटले आहेत.
पावसामुळे यंदा सर्वच जीवनावश्यक वस्तूंवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यात दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या कांदा, बटाटा आणि लसणाच्या उत्पादनावरदेखील विपरीत परिणाम झाला होता. पावसामुळे साठवणुकीचा जुना कांदा भिजल्याने खराब झाला होता. त्यामुळे बाजारात जुना कांदा मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे दरांमध्ये घसरण होत होती. अशातच आता पुणे व नाशिक जिल्ह्यांमधून कांद्याची नवीन आवक सुरू झाली आहे. सध्या मार्केटमध्ये १०० गाड्यांची आवक बाजारात होत असल्याने काद्यांचे दर घाऊक बाजारात १० ते २० रुपये किलो झाले आहेत.
बटाट्याचे भाव स्थिर असून १३ ते १९ रुपये किलो दर आहे. बाजारात ३५ ते ४० गाड्यांची आवक होत आहे. सद्यस्थितीत गुजरात व उत्तर प्रदेशमधून बटाट्याची आवक होत आहे. इंदोर व गुजरातमधून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लसणाची १५ ते ३० रुपये किलोने विक्री होत आहे. – अशोक वाळुंज, व्यापारी
महिन्याभरातील तफावत
५ नोव्हेंबर ५ डिसेंबर
कांदा २२ ते ३२ १० ते २०
बटाटा १७ ते २४ १३ ते १९
लसूण २५ ते ३५ २० ते ३०