गंगानगर : पुढारी वृत्तसेवा: येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स कारखान्याने सन २०२२-२०२३ या गळित हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय चेअरमन पी. एम. पाटील यांनी जाहीर केला.
ते पुढे म्हणाले की, कारखान्याने मागील गळीत हंगामातील उसाला प्रतिटन ३०४० रुपये याप्रमाणे उच्चांकी दर देऊन एफआरपी ची संपूर्ण रक्कम वेळेत अदा केली आहे. कारखान्याचे गाळप क्षमता विस्तारीकरणाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे प्रतिदिन 7500 मे टनांपर्यंत पूर्ण क्षमतेने कारखाना चालू आहे. यंदा कारखान्याकडे १७ हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. कारखान्याने यावर्षी १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यांनी केले आहे.
कारखाना चालू आहे. यंदा कारखान्याकडे १७ हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. कारखान्याने यावर्षी १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यांनी केले आहे.