फळावर काळे डाग, मुरूकुटा आणि कोळीचे आक्रमण
वाल्हे पुढारी वृत्तसेवा पुरंदर तालुक्यातील वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी परिसरात अंजीराचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. सध्या अंजीराच्या “खट्टा” बहाराला सुरुवात झाली आहे; मात्र, सततच्या पडत असलेल्या पावसामुळे अंजीर हे रोगाच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. पावसामुळे अंजीराच्या फळावर काळे डाग, मुरूकुटा आणि कोळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.
येथील अंजीर बागांवर अतिवृष्टी, सतत ढगाळलेल्या वातावरणामुळे सूर्यप्रकाश मिळत नसल्याने, अंजीर पिकांवर करपा, तांबेरा आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे, यामुळे फळ पिवळे पडून
गळू लागले आहे.
मागील दहा-पंधरा दिवसांपर्यंत सर्वच अंजीर बागा औषध फवारणीने सुस्थितीत होत्या. मात्र, मागील काही दिवसांपासून दररोज मुसळधार पाऊस, वातावरणातील बदलाने होत असलेले ढगाळ हवामान व यामुळे सूर्यप्रकाश मिळत नसल्याने अंजीराच्या फळावर व पानांवर विपरीत परिणाम होत असून, वातावरण अंजीर बागांना हानिकारक ठरत असून यामुळे फळांचा आकार वाढत नाही. तसेच फळांवर काळे डाग पडत असून करपा, तांबेरा व बुरशी आदी रोगांचा प्रादुर्भाव होऊन, अंजीर उत्पादकांना योग्य तो बाजार भाव मिळत नाही. अवकाळी पाऊस पडण्याअगोदर अंजीराला प्रतिकिलो ८० ते ९० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत होता.
मात्र, पावसानंतर अंजीर खराब झाल्यामुळे बाजार आता १५ ते २० रुपयांवर येऊन ठेपला असल्यामुळे शेतकल्याला खर्चही निघणार नसल्याचे चित्र समोर दिसत असल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून अंजीराच्या उत्पन्नामध्ये जवळपास ५० ते ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट होत असून अंजीर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
बागांवर झालेला खर्चदेखील निघणार नाही असे चित्र आहे. यामुळे शेतकन्यांच्या अडचणीत भर पडून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे अंजीर उत्पादक शेतकरी सूर्यकांत पवार, संभाजी पवार, विलास पवार, महेश पवार आदी शेतक-यांनी केली आहे.