सततचा पाऊस व अचानक पडणारे तीव्र ऊन यामुळे जमिनीला वाफसा येत नाही. तीव्र उन्हामुळे माती तापून उष्ण वाफ बाहेर पडते. या वाफेचा आघात प्रथम मुळांवर होतो व नंतर पानावर व फळांवर होतो. मुळे कोमजून मातीतून अन्नद्रव्यांची उचल खंडित होते व पानांवर विविध प्रकारच्या विकृती दिसू लागतात. परिणामी फुलगळ व लागलेली फळे विकृत होऊन गळून पडतात.
असे घडत असताना उत्पादक अभ्यास न करता फवारणी किंवा खते देत असतात. यामुळे देखील उत्पादनात घट होत असते. मी शेतकरी बांधवांना यावर काही उपाय सुचवतो त्यांचा नक्की फायदा होईल.
पीक कुठलेही असो उपाय समान
*उपाययोजना*
1)बुरशीनाशकांची फवारणी ph काढून सकाळी करावी.
2)कीटकनाशकांची फवारणी ph काढून सायंकाळी करावी.
3)जास्त औषधे एकत्र करून नये.
4)उच्च गुणवत्तेचे व्हर्मीवॉश ( गांडूळ पाणी) व काळा गुळ फवारल्यास पानांना मुख्य व दुय्यम अन्नद्रव्य उपलब्ध होऊन पानांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून फुलगळ थांबते.
(व्हर्मीवॉशमधील लिग्निन पिकास उपलब्ध झाल्याने अनेक फायदे दिसून येतात.)
5) एकापेक्षा जास्त औषध एकत्र करताने कोणते औषध पाण्यात पहिले टाकावे व कोणते दुसरे हे माहीत असणे गरजेचे.
*उदा:* बोर्डोमिश्रण तयार करताने आपण प्रथम पाण्याचा ph काढून त्यात मोरचुद टाकुन झाल्यावर चुना टाकतो. किंवा त्यात सल्फर टाकाव्याचे झाल्यास सर्वात शेवटी सल्फल टाकतो. यामुळे योग्य पद्धतीने मिश्रण तयार होऊन उत्तम रिझल्ट मिळतो.
याचप्रमाणे इतरही औषधांचा वापर क्रमवार करणे गरजेचे आहे.
6)शेतात साचलेले पाणी वेळीच बाहेर काढून द्यावे.
यामुळे लवकरात लवकर वाफसा होण्यास मदत होईल.
(शक्यतो लागवडी पूर्वी शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घेऊन थोडा मातीला उतार करून घ्यावा.
7) शेताला उतार करून बांध मजबूत असने अत्यंत महत्वाचे आहे.
शेताच्या बांधावर कधीही तणनाशकांची फवारणी करू नये. असे केल्याने अति पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहात उपयुक्त सूक्ष्म जीव वाहून जाऊन माती निकस बनते. यामुळे देखील उत्पादनात घट होत असते.
हे टाळण्यासाठी बांधावर गवताच्या मुळांचे जाळे जास्तीत जास्त घट्ट असणे गरजेचे असते.
8)सद्या मोठ्या प्रमाणात ठिबक संचाचा वापर शेतकरी बांधव करताना दिसतात. या ठिबकद्वारे पाणी देताने पाईपमधील पाणी तापलेले असताना देऊ नये.
एका ड्रीपर पासून दुसऱ्या ड्रीपर पर्यंत पाईपच्या आकारमानानुसार 60 ते 100 ml पाणी साचलेले असते. हे गरम पाणी पिकांच्या कोवळ्या मुळांवर अल्प कालावधी आघात करते.
हे टाळण्यासाठी पाईपमधील पाणी थंड अस्ताने पाणी देण्याचे नियोजन करावे.
9) रासायनिक खतांचा वापर माती परीक्षण करून समतोल प्रमाणात करणे हिताचे ठरते.
10)मातीत मोठ्याप्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्ध असतात. तरी आपण अनावधाने खतांचा पुरवठा करत असतो. याचा परिणाम अन्नद्रव्यांची उचल होण्यावर होत असतो. हे पण ध्यानात घेणे गरजेचे असते.
11) मातीत सूक्ष्म जीव मुख्य व दुय्यम अन्नद्रव्याचे विघटन होण्यासाठी उपयुक्त सूक्ष्म जीव संख्या वाढवण्याची नितांत गरज असते. यासाठी सेंद्रिय खते किंवा कंपोस्ट शेणखत वापरावे
12)पावसाळ्यात जीवामृत देणे हिताचे ठरते.
*जीवामृतचे कार्य:*
आपण जेवण केल्यावर जेवण पचवण्याचे काम लाळग्रंथी करत असते. तसे शेतातील रासायनिक खतांना पचवण्याचे व रासायनिक खतांचे अल्पकालावधीत विघटन करून जैविक अन्नसाठा उपलब्ध करून देण्याचे काम जीवामृत करत असते. यामुळे खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते.
13)बऱ्याच वेळी पावसाच्या कालावधीत रासायनिक औषधांच्या फवारण्या घेणे शक्य होत नाही.
यावेळी जैविक बुरशीनाशकांची फवारणी उपयुक्त ठरते.
उदा: ट्रायकोडर्मा
14)मातीला वाफसा येण्यासाठी मोठ्याप्रमाणात फॉस्फरिक ऍसिडचा वापर केला जातो.
प्रथम जमिनीतून देण्यासाठी कोणते फॉस्फरिक ऍसिड वापरावे हे समजूनच वापरावे. शक्यतो देणे टाळावे.
*दत्तात्रय ढिकले*
अध्यक्ष-AORF INDIA
Mo 9922381436
Web: www.deepjyoti.in.net