सध्या सोयाबीनची काढण्याचे काम सुरू असून बऱ्याच प्रमाणात नवीन सोयाबीन बाजारांमध्ये विक्रीसाठी येत आहे. दिवाळीचा सण आल्यामुळे बरेच शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. परंतु त्या दृष्टिकोनातून जर आपण आवकेचा विचार केला तर सोयाबीनचे बाजार भाव शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या प्रमाणात नाहीत. सध्या 4000 ते 5400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत आहे. या पार्श्वभूमीवर या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील काही निवडक बाजार समितीतील बाजार भाव पाहू.
सोयाबीनचे कालचे बाजार भाव
1- लासलगाव- विंचूर- लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये आज 2786 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. यामध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला किमान तीन हजार ते कमाल पाच हजार चारशे रुपये क्विंटल इतका बाजार भाव मिळाला. भावाची सरासरी पाच हजार रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.
2- अचलपूर बाजार समिती- अचलपूर बाजार समितीमध्ये आज दोनशे पस्तीस क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यामध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला कमीत कमी चार हजार तर कमाल 4500 रुपये इतका दर मिळाला. भावाची सरासरी चार हजार दोनशे पन्नास इतकी राहिली.
3- नागपूर बाजार समिती- नागपूर बाजार समितीमध्ये आज 5067 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. झालेल्या लिलावात किमान चार हजार 350 ते कमाल पाच हजार 330 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. भावाची सरासरी पाच हजार 85 रुपये क्विंटल इतके राहिली
4- अकोला बाजार समिती- अकोला बाजार समितीमध्ये आज 3123 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यामध्ये झालेल्या लिलावात कमीत कमी तीन हजार 550 क्विंटल तर जास्तीत जास्त पाच हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. भावाची सरासरी चार हजार चारशे साठ रुपये राहिले.
5- मलकापूर बाजार समिती- मलकापूर बाजार समितीमध्ये आज 2625 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. झालेल्या लिलावात किमान 3925 प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त पाच हजार एकशे एकवीस रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. भावाची सरासरी चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतके राहिली.
6- देऊळगाव राजा- या ठिकाणी आज 85 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. झालेल्या लिलावात कमीत कमी तीन हजार पाचशे तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.
भावाची सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.
7- उमरखेड- उमरखेड या ठिकाणी आज 170 क्विंटल सोयाबीनची आवक झाली व झालेल्या लिलावात किमान पाच हजार ते कमाल पाच हजार दोनशे प्रति क्विंटल इतका दर मिळाला. सोयाबीन भावाची सरासरी पाच हजार शंभर रुपये इतके राहीली.