सध्या सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. आज सोयाबीनला सर्वाधिक भाव 5811 रुपये मिळाला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 19333 क्विंटल सोयाबीनची (Soyabean Rate Today) आवक झाली होती.
यासाठी किमान भाव ४९५२ कमाल भाव ५८११ आणि सर्वसाधारण भाव 5500 इतका मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचा तुटवडा असल्याने यावेळी सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. देश-विदेशात सोयाबीनची वाढती मागणी आणि सोयाबीनचे कमी उत्पादन यामुळे देशातील विविध मंडईंमध्ये सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ होत आहे.
खरिपातील मुख्य पीक सोयाबीन सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) बाजारात विकले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, सोयाबीनचे उत्पादन देखील वाढत आहे. अनेक शेतकरी याकडे वळाले आहेत. भारतातील सोयाबीन पिकवणारी प्रमुख राज्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश आणि राजस्थान आहेत.
तसेच भारताव्यतिरिक्त अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, युक्रेन या देशांमध्ये प्रामुख्याने सोयाबीनची लागवड होते. देशातील विविध मंडईंमध्ये सोयाबीनचा भाव 5000 ते 8000 रुपयांपर्यंत आहे. यामुळे सगळीकडेचे सोयाबीनला चांगला दर दिला जात आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. सध्या महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे.