ऊसाच मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या प्रामुख्याने किडी म्हणजे खोडकिड, हुमणी, लोकरी मावा, पायरीली, खवलेकीड, कांडीकीड, पांढरीमाशी आणि उंदीर. अशा १४ प्रकारच्या किडी आणि उंदरासारखा प्राणी उसाच नुकसान करतात.
- सर्वांत मोठं नुकसान खोडकिडीमुळे होत. २५ ते ३०% उत्पादन घटत आणि १ ते १.५ टक्का साखरउतारा घटतो. खोडकिडीमुळे मातृकोंब नष्ट होतात. त्यामुळे फुटवे कमी आणि कमजोर निघतात. खोडकिडीची अंडी अळी – कोष आणि पतंग अशा चार अवस्था असतात. फेब्रुवारीनंतर लावलेल्या उसात खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. हि कीड पुढे कांड्यात जाते. तिथंही नुकसान करते. म्हणून हिच्या नियंत्रणासाठी-
- उसाचं पहिलं पण काढून टाकाव.
- खोल सरीमध्ये उसाची लागण करावी.
- फेब्रुवारीनंतर लागण करू नये. पाचटाचे आच्छादन करावे.
- बाळबांधणी चांगली करावी. कामगंध सापळे वापरावेत.
- ट्रायकोग्रमा हे मित्रकीटक सोडावेत. मॅलोथियॉनची बीजप्रक्रिया करावी. दाणेदार लिण्डेन अगर सेव्हीडॉल १० किलो जमिनीतून द्यावे.
- दुसरी नुकसानकारक कीड म्हणजे हुमणी. अंडी – अळी – कोष आणि भुगेरे या सगळ्या अस्वस्था नुकसान करतात म्हणून एक उपाय न योजता एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा वापर करावा लागतो. नांगरट, ढेकळ फोडण, पिकाची फेरपालट, सापळा पिकांचा वापर, अळ्या वेचून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकणे, भुंगेरे गोळा करून मारणे, शेत स्वच्छ ठेवावं. प्रादुर्भावग्रस्त उसाचा खोडवा घेऊ नये. बाभळी – कडूनिंबाच्या झाडावर कार्बारीलची फवारणी करावी. १०% दाणेदार फोरेट लागणीच्या वेळेत ४ किलो मातीत मिसळाव. मॅलेथियॉनची भुकटी खातात मिसळून घालावी. मोठ्या उसात क्लोरोपायरीफॉस सरीतून द्यावे. अशा प्रकारचे सगळे उपाय करून हुमनीचं नियंत्रण करावे.
- उसावर येणाऱ्या पांढऱ्या लोकरीत माव्यामूळं उसाच्या उत्पादनात ७ ते १० आणि साखर उताऱ्यात ३.५% म्हणजे कमालीची घट येते! गेल्या ५ – ६ वर्षापूर्वी उसाचं अति मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण अलीकडं मित्र कीटकांची संख्या वाढल्याने लोकरी मावा नियंत्रणात आला आहे. लोकरी माव्याच्या बाल्यावस्था आणि प्रौढ अवस्था फार नुकसानकारक आहेत.
- लोकरी माव्याच बरसच नियंत्रण मित्र कीटकांमुळे झालेलं आहे! कोनोबाथ्रा हा मित्र कीटक रात्री मावा खातो. महिनाभराच्या आयुष्यात ४००० पेक्षा जास्त मावा खातो. एकरात ४०० कोनोबाथ्रा सोडाव्यात. मगरी अळी एका दिवसात ४० – ५० मावा खाते. सिरफीड – माशी एका दिवसात १५० पेक्षा जास्त मावा खाते. सिरफीड माशीच्या एकरी ४०० अळ्या तोडाव्यात. क्रायसोपर्ला कारनी हा मित्र कीटक प्रचंड भूक असणारा असल्याने दिवसात ३०० पेक्षा जास्त मावा खातो! हा जास्त तापमानातही वाढतो.
- मित्र किटकाची अंडी – अळ्या उसाच्या पानाच्या मागच्या बाजूस टाचणीने टोचून लावावेत. प्रादुर्भावग्रस्त भागात सोडल्यास त्यांचा प्रसार झपाट्याने होतो! ते चांगले स्थिरावतात.
- याशिवाय रासायनिक खताचा संतुलित वापर करावा. नत्र कमी द्यावे.
- दोन ग्रॅम असिफेट + १ लिटर पाणी यांची फवारणी करावी. अगर
- ४% मॅलोथियॉनची धुरळणी करावी.
- त्याच बरोबर एकरी १० किलो दाणेदार फोरेट टाकावे. म्हणजे लोकरी माव्याच नियंत्रण होईल.
पायरीला किंवा तुडतुडे उसाच्या पानातल रस शोषतात. मॅलोथियॉन, अॅसिफेट अगर
क्कीनालफॉसच्या फवारण्या कराव्यात. खवलेकिडींचही या फवारणीमुळे नियंत्रण होईल.
अशा पद्धतीने उसावरील किडीच एकात्मिक नियंत्रण करणे गरजेचे आहे.