पिंपरी-शहरातील मोशी, पिंपरी, चिंचवडगाव व आकुर्डी येथील भाजी मंडईमध्ये दिल्ली गाजराची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. मोशी येथे 116 क्विंटल गाजराची आवक झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात 60 ते 70 रुपये दराने विक्री होत असलेल्या गाजराचे दर उतरून 30 ते 40 रुपये किलो झाले आहेत. तर भाजीपाल्याची आवक अधिक असल्याने इतर दरही स्थिर असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.
बाजारात पालक, मेथी, कोथिंबीर, पुदीना, शेपू आदींचे घाऊक बाजारातील दर पाच ते सात रूपये असल्याने किरकोळ बाजारात दहा ते पंधरा रूपये दराने पेंडीची विक्री झाली. बाजारात बटाट्याची आवक 780 क्विंटल एवढी झाली. गेल्या आठवड्यातील 935 क्विंटल आवक झाली. तुलनेत या आठवड्यात 155 क्विंटल आवक घटली आहे. घाऊक बाजारात 10 ते 11 रूपये किलो दराने विक्री होत आहे.
कांद्याची आवक 400 क्विंटल झाली असून, मागील आठवड्यातील320 क्विंटल झालेली आवक 80 क्विंटलने वाढली आहे. घाऊक बाजारात कांदा 8 ते 10 रूपये दराने विक्री होत आहे.
टोमॅटोची आवक 459 क्विंटल एवढी झाली असून, घाऊक बाजारात 7 ते 8 रूपये किलो दराने विक्री झाली. भेंडीची आवक 71 क्विंटल एवढी झाली असून, घाऊक बाजारात 5 ते 7 रूपये प्रति किलो दराने विक्री झाली. काकडीची आवकही 73 क्विंटल एवढी झाली असून, घाऊक बाजारात 9 ते 10 रूपये प्रति किलोने विक्री होत आहे.
पालेभाज्यांच्या 58,500 पेंड्यांची आवक झाली आहे. तर फळ भाज्यांची 3131 क्विंटल आवक झाली आहे.पिंपरी : शहरातील मोशी, पिंपरी, चिंचवडगाव व आकुर्डी येथील भाजी मंडईमध्ये दिल्ली गाजराची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. मोशी येथे 116 क्विंटल गाजराची आवक झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात 60 ते 70 रुपये दराने विक्री होत असलेल्या गाजराचे दर उतरून 30 ते 40 रुपये किलो झाले आहेत. तर भाजीपाल्याची आवक अधिक असल्याने इतर दरही स्थिर असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.
दिल्ली गाजराची आवक वाढली
बाजारात दिल्ली गाजराची राजस्थान, जैसलमेर या भागामधून मोठी आवक होते. येथील मातीमध्ये गाजराचे उत्पादन अधिक घेतले जाते. महाबळेश्वर येथील गाजराची आवक कमी होत असल्याने बाजारात गाजराचे दर वाढले होते. मात्र दिल्ली गाजरामुळे सध्या दर उतरले आहेत.
भाजीपाल्याचे दर कमी झाले की, नागरिक दारापर्यंत येणार्या हातगाडी वाल्यांकडून भाजीपाल्याची खरेदी करतात. सध्या सर्वच भाज्यांचे दर उतरले आहेत. त्यामुळे ग्राहक हातगाडीवाल्यांकडून खरेदी करतात. परिणामी आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे एका भाजी विके्रत्याने सांगितले.
पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या दर (प्रतिरजुडी)
मेथी 15
कोथिंबीर 10
कांदापात 15-20
शेपु 15
पुदिना 10
मुळा 20
चुका 15
पालक 15
कांदा 30-35
बटाटा 30-35
लसूण 50-60
आले 60-65
काकडी 40
भेंडी 60
गवार 60
गावरान गवार 70 ते 80
टोमॅटो 20
दोडका 40
हिरवी मिरची 40-50
दुधी भोपळा 40
लाल भोपळा 40
कारली 50
वांगी 30
भरीताची वांगी 40
तोंडली 50
पडवळ 40
फ्लॉवर 20
कोबी 20
शेवगा 80-100
गाजर 30-40
ढोबळी मिरची 50
वटाना 80
बिन्स 50