केंद्र सरकार शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेत आहे. आता सरकारने एक मोठा घेतला आहे. तो म्हणजे आता शेतकऱ्यांना घरबसल्या सर्व औषधे मिळणार आहेत. शेतकरी आता घरी बसून औषधे मागवू शकतात.
आता शेतकरी त्यांच्या शेतीसाठी लागणारी कीटकनाशके घरी बसून मागवू शकतात. कीटकनाशकांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता अन्य ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही. भारतातील अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांकडून ऑनलाईन कीटकनाशकांची विक्री केली जाणार आहे. कृषी मंत्रालयाने कीटकनाशक नियम 1971 मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.
कीटकनाशकांच्या व्यापारासाठी परवाना असलेल्या कंपन्या आता सर्व प्रकारची कीटकनाशके ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना विकू शकतील. यासाठी परवानाधारक कंपन्यांची वैधता ठरवण्याची जबाबदारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची असणार आहे.
कीटकनाशके थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचवल्यास शेतकऱ्यांचा वेळही वाचणार आहे. शेतकऱ्यांना चांगली कीटकनाशके देखील उपलब्ध होतील. ही कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेही जावं लागणार नाही. घरपोच त्यांना कीटकनाशके मिळणार असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं कंपन्यांनी म्हटलं आहे
भारतातील अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाइटवर कीटकनाशके उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं आता शेतकऱ्यांना योग्य व सुरक्षित कीटकनाशके खरेदी करण्यासाठी फारसा पैसा खर्च करावा लागणार नाही. तसेच विनाकारण दुकानांमध्ये फिरण्याची गरज पडणार नाही. शेतकरी फक्त ऑनलाइन ऑर्डर देऊन किटकनाशकांची होम डिलिव्हरी मिळवू शकतात.
कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कंपनीकडे परवाना असणे मात्र, बंधनकारक करण्यात आलं आहे. परवान्याचे नियम पाळणे कंपनीला बंधनकारक असणार आहे. परवान्याची पडताळणी करण्याची जबाबदारी ई-कॉमर्स कंपनीची असेल. यामुळं बाजारात स्पर्धा वाढणार आहे. यातून कीटकनाशके शेतकऱ्यांसाठी स्वस्त होणार आहेत.