भारतीय संस्कृतीत दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीला मान आहे. वसुबारस म्हणजेच गाय आणि वासरू. या दिवशी गाय-वासराची पूजा करत दिवाळी पर्वाला सुरुवात होते. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे.
अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते. या वसुबरारसेचं नेमकं महत्त्व काय? याविषयीची माहिती जाणून घेऊ..
दिवाळीचा पहिला दिवस हा गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते.
भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. गायीच्याप्रती कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरु यांची पूजा केली जाते. आश्विन वद्य द्वादशी, या तिथीला वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी असे म्हणतात.