देशात रब्बी हंगामाचा (Rabi Season) आगाज झाला आहे. खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू असून काही ठिकाणी खरीप हंगामातील पिकांचे हार्वेस्टिंग (Harvesting) पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात देशात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे.
नव्हेनवे तर काही ठिकाणी रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधवांनी (Farmer) कंबर देखील कसले आहे. शेतकरी बांधव रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी सज्ज झाले असून पेरणी साठी आवश्यक बी-बियाणांचा तसेच खतांचा पुरवठा करण्यासाठी शेतकरी बांधव लगबग करत असल्याचे चित्र आहे.
मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे की, रब्बी हंगामात शेतकरी बांधव जवस, हरभरा, गहू, मोहरी यांसारख्या वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असतात. खरं पाहता रब्बी हंगामात गव्हाच्या लागवडीखालील (Wheat Cultivation) क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या राज्यातही गव्हाची लागवड (Agriculture) मोठ्या प्रमाणात केली जाते.
जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांना निश्चीतच गव्हाची शेती फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे. मात्र यासाठी शेतकरी बांधवांनी गव्हाच्या सुधारित जातींची (Wheat Variety) पेरणी करणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण नव्याने विकसित झालेल्या गव्हाच्या एका जाती विषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो आज आपण एमएसीएस 6478 या गव्हाच्या जातीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेअंतर्गत असलेल्या पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी गव्हाचे MACS 6478 हे वाण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी विशेष विकसित केले आहे. जाणकार लोकांच्या मते या गव्हाच्या शेतीतून शेतकऱ्यांना दुपटीने उत्पादन मिळणार आहे.
ज्या शेतकरी बांधवांनी या गव्हाची पेरणी केली आहे त्या शेतकरी बांधवांच्या मते, गव्हाची ही नवीन जात प्रती हेक्टर 45-60 क्विंटल गव्हाचे उत्पादन देण्यास सक्षम आहे. खरं पाहता गव्हाच्या इतर सामान्य वानापासून हेक्टरी केवळ 25-30 क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळते.
मात्र या नव्याने विकसित झालेल्या गव्हापासून तब्बल 45 ते 60 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याने या गव्हाची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे. मित्रांनो नव्याने विकसित झालेला हा गहू चपातीसाठी आणि पोळीसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा जाणकार लोकांनी केला आहे. विशेष म्हणजे हा गहू पेरणी केल्यापासून मात्र 110 दिवसात काढणीसाठी तयार होतो आणि तब्बल 60 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्यास सक्षम आहे.